लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंसह नवोदित आणि उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून खासदार क्रीडा महोत्सव 2023 चे आयोजन केले असून हे या योजनेचे दुसरे वर्ष आहे क्रीडा क्षेत्रातील या महाकुंभात यावेळी तब्बल 11 खेळांचा समावेश असून परंपरागत बैलांचा शंकरपट कुस्ती कबड्डी आणि फ्लड लाईट क्रिकेट आकर्षणाचा विषय ठरणार आहे. खेळाच्या या महाकुंभाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते १० मार्च रोजी रेल्वे ग्राउंड माधव नगर भंडारा येथे सकाळी ११:०० वा होणार आहे
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील महिला आणि पुरुष खेळाडूंना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील क्रीडा गुणांना वाव देण्याचे हेतूने मागील वर्षा पासून खासदार सुनील मेंढे यांनी खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केली पहिल्याच वर्षी हजारो स्पर्धकांनी यात सहभागी होत क्रीडा महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला होता विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जिव्हाळ्याचा असलेला बैलांचा शंकर पट पहिल्यांदाच क्रीडा महोत्सवात समाविष्ट केला गेला होता.
यावर्षी पुन्हा एकदा या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 9 मार्चपासून क्रीडा क्षेत्रातील या महाकुंभाला सुरुवात होत आहे क्रिकेट कबड्डी कुस्ती तलवारबाजी बैलांचा शंकरपट हॉकी कराटे तिरंदाजी फुटबॉल बॅडमिंटन अशा 11 खेळांचा समावेश या महोत्सवात करण्यात आला आहे फ्लड लाईट क्रिकेट ने महोत्सवाची सुरुवात होत असून ही स्पर्धा खुली आहे स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस तीन लाख रुपये आहे मॅरेथॉन स्पर्धा प्रत्येक तालुकास्तरावर होणार असून अन्य सर्व स्पर्धा या लोकसभा स्तरीय राहणार आहे सर्वच स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस दिली जाणार आहेत. विशेष आकर्षण असलेल्या बैलांच्या शंकरपटावर आकर्षक बक्षिसांची लूट करण्यात आली आहे. बैलांच्या शंकरपटामुळे ग्रामीण भागात चैतन्याचे वातावरण तयार होते
09 ते 18 मार्च यादरम्यान होत असलेल्या या क्रीडा महोत्सवात भंडारा गोंदिया जिल्ह्यात अनेक सामने खेळविले जाणार आहे स्त्री-पुरुष अशा प्रकारात होणाऱ्या या स्पर्धांमध्ये लोकसभा मतदारसंघातील खेळाडूंनी सहभागी व्हावे आणि खेळाच्या या महाकुंभात स्वतःचे योगदान द्यावे असे खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.