भंडारा :- भंडारा शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून आता नगर परिषदेने अतिक्रणविरोधी मोहिम राबवित अनेक अतिक्रमण तोडले आहे. त्यामुळे भंडारा शहरात अतिक्रमण केलं असेल अशा लोकांवर कारवाही केली जाणार आहे. दिवसेंदिवस भंडारा शहरात रस्त्यांवर अतिक्रमण वाढले असुन याचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. रस्तावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून त्यासाठी नगर परिषदेने फेब्रुवारी महिन्या पासून अतिक्रमण हटाव मोहिम राबवित आहे. बरेच अतिक्रमण काढले असून सुध्दा पुन्हा रस्त्यांवर पान टपरी, चायनीज ठेले, किंव्हा घरगुती लोकांनी सुध्दा रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण धारकांना नगर परिषदेने नोटीस बजावले पण या नोटीसानाकडे अतिक्रमण धारकाने दुर्लक्ष केले. त्यासाठी नगर परिषदेने अतिक्रमनावर बुलडोझर चालवीत पक्के घरांचे अतिक्रमण देखिल काढले आहे. जर पुन्हा अतिक्रमण केलं तर तशी माहिती नगर परिषदेला देण्यात यावी असे आव्हानही नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासठी नगर परिषदेने कंबर कसली असून आता अतिक्रमणं धारकांवर कारवाही केली जाणार आहे.
