तुमसर :- छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तुमसर जिल्हा भंडारा दिनांक 05/03/2023 रोज रविवारला राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून तुमसर शहरातील विविध भागात रस्त्याने ये-जा करणारे पादचारी, वाहनधारक, कारचालक इत्यादींना सुरक्षेचे महत्व समजावून सांगत जाणीव जागृती केली यावेळी सुरक्षेसंबंधित विविध संदेश फलक हातात घेऊन नागरिकांना स्वतःची व इतरांची सुरक्षा किती महत्त्वाची आहे याची जाण करून दिली.

प्रथमतः कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर समोरील मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना फलकाच्या माध्यमातून हेल्मेट व सीट बेल्ट चा वापर करावा, उंचावरील कामे करतांना सेफ्टीबेल्ट चा वापर, वाहने चालवित असतांना मोबाईल चा वापर टाळावा अशा प्रकारचे व इतर संदेश दिले. त्यानंतर जुना बस स्टॅन्ड चौक येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व सांगण्यात आले यावेळी पोलीस स्टेशन तुमसर चे पोलीस उपनिरीक्षक श्री. विजयसिंह गोमलाडू यांचे मार्गदर्शन तर वाहतूक पोलीस शिपाई श्री. समित रहांगडाले व श्री. गोविंद तांडेकर यांचे सहकार्य लाभले. प्रस्तुत उपक्रम प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, सुमित जिभकाटे, प्रज्वल बुद्धे, तुषार बागडे, मयूर पुडके,संकेत बुद्धे, अंकुश गभने, नितिन सार्वे, दिपाली मते,वैष्णवी मेश्राम, साक्षी चन्ने, व इतर मावळ्यांच्या परिश्रमातून व सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झाला.
