सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा वार्षिक मेळावा

भंडारा :- कल्याणकारी असोसिएशन भंडारा च्या वतीने दिनांक 21/ 3 / 23 रोजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा वार्षिक मेळावा बहुउद्देशीय सभागृह पोलीस मुख्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटक अध्यक्ष लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे काशिनाथजी माकडे सेवानिवृत्त समादेशक राज्य राखीव बलगट नागपूर,विजय डोळस ,पोलीस उप-अधिक्षक (मुख्यालय) तसेच असोसिएशनचे मार्गदर्शक इलमकर सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, बुराडे सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बेनी माधव यादव सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक ठवरे सेवानिवृत्त राखीव फौजदार संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन भोवते, उपाध्यक्ष ओंकार श्रीवास ,खजिनदार अब्दुल शहीद शेख, सहसचिव नंदकिशोर माहुरले सदस्य रवि लांजेवार , मनोरमा बनंसोड ,ईश्वर जी शेंडे, भंडारा तालुकाध्यक्ष माणिक घोडीचोर जयप्रकाश मलेवार तालुकाध्यक्ष तुमसर,वसंता मडावी,अरविंद कानेकर,नारायण माकडे,दादाराव सावे,शशिकांत हटटेवार,रणभिड नवखरे,सिधदेशवर थोटे, भाऊराव कोचे ,जगनाडे व इतर पदाधिकिरी/सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाला सुरुवातीला संघटनेची प्रस्तावना श्री यादव साहेब यांनी केली व मंच संचालन श्री लियाकत खान यांनी केले मेळाव्यात 70 वर्षाचे सेवानिवृत्त अधिसकारी/ कर्मचारी यांचे तसेच 80 वर्ष वयाचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे मासननीय लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा यांनी शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले, कार्यक्रमाला उपस्थित पोलीस अधीक्षक यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याकरिता व त्याचे निराकरण करण्याकरिता कार्यालयीन अधीक्षक व कार्यालयीन कारकुनांना समक्ष बोलावून कर्मचाऱ्यांच्या हिताच्या अडचणीच्या निवारण केले आणि य अधिकारी कर्मचारी यांच्या असलेल्या मागण्या व अडीअडचणी बाबत पाठपुरावा करून अडचणी निकाली काढण्याचे हमी दिली