Homeसंपादकीयनगर परिषद कस्तूरबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे वार्षिक सांस्कृतीक क्रीडा...

नगर परिषद कस्तूरबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे वार्षिक सांस्कृतीक क्रीडा महो्सव व बक्षीस वितरण समारंभ संपन्न

तुमसर:-दि. 29/12/2022 वे दि. 31/12/2022 क्रिडा महोत्सव व दि. 02 /01/2023 ते 03/01/2023 ला सांस्कृतीक व बक्षिस वितरण समारंभ नगर परिषद कस्तुरबा विदयालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर शाळेच्या मैदानावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडला.

दि. 29/12/2022 ते 31/12/2022 शाळेमध्ये क्रिडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. “खेळामुळे विदयार्थ्यांचा सर्वागीण “विकास होतो निर्णयक्षमता, सहानभूती, शिस्त आणी सहकार्याची भावणा निर्माण होते. हे मोलाचे विचार शाळेचे मुख्याध्यापक श्री भट सर व उदघाटणाचे प्रमुख पाहुने…..यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले “

न. प .कस्तुरबा विद्यालयातील दिनांक 29/12/2022 च्या क्रीडा मोहोत्सवाचे उद्‌घाटक माननीय नितीनजी चिंचोळकर साहेब पोलीस निरीक्षक तुमसर, मा.रहांगडाले साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग तुमसर , मा. देवानंदजी सावके साहेब प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग तुमसर , मा.शिवानंद बरडे प्रशासन अधिकारी तुमसर या मान्यवरांच्या- हस्ते झाले, मान्यवरांचे स्वागत फुलांचे रोपटे देवून करण्यात आले. त्यानंतर क्रिकेट सामन्यांची सुरुवात मान्यवरानी क्रिकेट खेळून सुरू केली. वर्ग निहाय क्रिकेट चे सामने घेण्यात आले. सर्व खेडाळू आपले सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते, नागरीकांनी, विद्यार्थ्यांनी सामने बघण्यासाठी मैदानात गर्दी जमलेली होती. सर्व विजयी संघाचे अभिनंदन करण्यात आले. दिनांक 30/12/2022 ला क्रीडा संमेलनाचा दुसरा दिवस या कार्यक्रमाचे उद्‌घाटक माननीय .जांभूळकर साहेब नायब तहसीलदार तुमसर , अध्यक्ष माननीय प्रकाश जी वंजारी सर माजी प्राचार्य तुमसर , प्रमूख पाहुणे माननीय रमा लांडगे मॅडम लेखापाल न प तुमसर ,श्री.संजय जी बडवाईक, श्री.प्रल्हादजी बावनकर , मा.नाझर सर तहसील कार्यालय तुमसर उपस्थित होते.सर्व पाहुण्यांचे स्वागत फुलांचे रोपटे देवून करण्यात आले ,त्यानंतर सामन्यांची सुरुवात मान्यवरांच्या क्रिकेट खेळण्याने झाली . यानंतर शिक्षक ,शिक्षीका यांच्यांत सुदधा क्रिकेट स्पर्धा सुरु झाली त्यामधे शिक्षक संघाला विजय प्राप्त झाला.
दिनांक 31/12/2022 ला ‘वर्गसजावटीचा कार्यक्रम घेण्यात आला सर्व वर्गानी सुंदर अश्या पद्धतीने वर्गाची सजावट केली होती. त्याचे परिक्षण करण्यासाठी न.प मालवीय शाळा तुमसर मुख्याध्यापक श्री फुंड सर तसेच न प माधोराव पटेल प्रा.शाळा तुमसर चे मुख्याध्यापक श्री उपरिकर सर उपस्थित होते.
दिनांक 02/01/2023 रोजी शाळेच्या भव्य पटांगणात शैक्षणीक वर्षाचे सांस्कृतीक कार्यक्रम मान्यवर, पालक, नागरीक तसेच
विद्यार्थ्याच्या भव्य उपस्थीतीत संपन्न झाले. समारंभाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यानी लेझीम व ब्रँड पथकाच्या जल्लोषात मोठ्या थाटा माटात केले.
समारंभाचे उद्‌घाटक पाहुणे माननीय सिद्धार्थ मेश्राम साहेब मुख्याधिकारी नगर परिषद तुमसर , अध्यक्ष सूनिलजी जीभकाटे साहेब आगार प्रमुख तुमसर ,प्रमुख पाहुणे , सूनीलजी साळुंखे साहेब उपमुख्याधिकारी न. प तुमसर ,देवानंद सावके साहेब प्रशासकीय अधिकारी न प तुमसर ,माननीय भट सर प्राचार्य न. प कस्तुरबा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर यांनी आपले स्थान भूषवीले होते . कार्यक्रमात शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रजवलन करण्यात आले. त्यानंतर वर्ग ।। वीच्या विदयार्थीनींनी ‘हा स्वागताचा सोहळा’ या स्वागत गिताने आपल्या सुमधुर आवाजात पाहुण्यांचे स्वागत केले, शाळेच्या जेष्ठ शिक्षीका श्रीमती पडोळे मॅडम यांनी मान्यवरांचे शाल श्रीफळ व फुलांचे रोपटे देवून स्वागत केले. त्यानंतर वर्ग 7वी च्या विद्यार्थ्यांनी संविधान गीतावर नृत्य,तसेच वर्ग 10वी व 12वीच्या विद्यार्थीनींनी मल्हार नृत्य व व वर्ग 11वीच्या विद्यार्थीनींनी गणेश वंदना पाहुण्यांसमोर सादर केले ते सर्वांचे आकर्षन ठरले , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.पडोळे सर ,श्रीमती गणविर मॅडम व श्रीमती .गायकवाड मॅडम यांनी केले. सर्वांच्या सत्कारानंतर महाविदयालयाचे प्राचार्य श्री भट सर यांनी प्रास्तावीक सादर करून सन 2022-23 या शैक्षणीक वर्षातील महाविदयालयात झालेल्या, शैक्षणीक, सांस्कृतिक, कला क्रिडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कामाचे आणी विदयार्थ्याच्या उत्साहाचे कौतूक केले. कार्यक्रमाचे उद्‌घाटक माननीय मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम साहेब यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचे महत्व व वाचनाचे महत्व समझावून सांगीतले तसेच संवीधानाचे महत्व पटवून दिले.
‘मान्यवरांचे स्वागत व भाषणांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमाला सुरुवात झाली .सांस्कृतीक कार्यक्रमाचे सुञसंचालन श्रीमती कठाने मॅडम व व्यवसाय प्रशिक्षिका कु. पल्लवी गोस्वामी मॅडम यांनी केले. वर्गनिहाय प्रत्येक विद्यार्थ्यांनी आप आपल्या वर्गाचे सामूहीक नृत्य सादर केले. या बाहारदार नृत्यांनी सर्व प्रेक्षकांच्या माना डोलावल्या. सर्वात शेवटी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले ते ब्युटी अँन्ड वेलनेस या विषयाच्या विदयार्थीनींनी केलेले ‘फैशन शो’ , या फैशन शो ने सर्वांची मने जिंकली.
दि. 2 /01 /2023 या दिवसाचा शेवट शिक्षक व विदयार्थ्यांनी तसेच मुख्याध्यापकांनी डी. जे. च्या तालावर नाचून केला . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती शेंडे मॅडम व श्री सावरकर सर,श्री पडोळे सर यांनी केले.
दिनांक 3/01/2023 ला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. कार्यक्रमाला. उद्‌घाटिका श्रीमती योगिता परसगडे मॅडम महिला व बालकल्याण अधिकारी पंचायत समिती तुमसर ,अध्यक्ष श्री.वामन मोटघरे सर बीडीसीसी बँक व्यवस्थापक ,प्रमुख पाहुणे – माननीय सुनील पारधीजी, श्री.महेश माधवानी व्यापारी संघटना तुमसर,श्री.राजू इखार ,श्रीमती वैशाली पारधी ,श्रीमती कविता पारधी,श्री. मैताप सिंग ठाकूर मा जी नगरसेवक तुमसर,,सूर्यकिरण पटले,,श्री सुशील लांजेवार,श्रीमती,वैशाली डुंभरे,झोन चेअर पर्सन तुमसर महेश निमजे लायन्स क्लब गोल्डन अध्यक्ष ,प्रल्हाद बावनकर,कोषाध्यक्ष, श्रीमती.अंजली बारसागडे मॅडम कर निरीक्षक न प तुमसर ,श्री. तरुण जी सोनी, श्री.जितेंद्र चौरे साहेब विद्युत अभियंता तुमसर ,मृणाल हुमने बांधकाम अभियंता न प तुमसर इत्यादी मान्यवर उपस्थीत होते. सर्व मान्यवरांचे स्वागत सुंदर फुलांचे रोपटे देवून करण्यात आले. मान्यवरांच्या भाषणानंतर क्रिडा स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या संघाला तसेच सांस्कृतीक कार्यक्रमात प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यानच्या गटांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. बक्षीस स्वीकारतांना विद्यार्थ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. आणी तो बघण्यासारखा होता, या दिवसाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती भुजाडे मॅडम यांनी अतीशय सुंदर पद्धतीने पार पाडले .आभार प्रदर्शन व बक्षीस वितरणाचे सुंदर नियोजन श्री . प्रा.सावरकर सर यांनी केले.
बक्षिश वितरणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भोजणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.अतिशय नियोजन बध्द पद्धतीने श्री सावरकर सर आणी श्री पडोळे सर ‘ आणि श्रीमती पडोळे मॅडम यांच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण भोजन व्यवस्था पार पडली. भोजनाची व्यवस्था शाळेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती नंदनवार मॅडम, यांनी सुध्दा अतिशय उत्कृष्ट पणे पार पाडली. सर्व शिक्षक शिक्षीका, इतर कर्मचारी मान्यवर, तसेच विद्यार्थ्यांनी सह-भोजनाचा आनंद घेतला.या 5 दिवसीय क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री प्रा. सावरकर सर , श्री पडोळे सर,सौ पडोळे मॅडम,भोजन व्यवस्था श्रीमती नंदनवार मँडम, सांस्कृतीक प्रमुख – श्रीमती शेंडे मॅडम श्री भुजाडे मॅडम, श्रीमती कठाणे मँडम, श्रीमती के पल्लवी मॅडम, पुजा व्यवस्था – कु· गणवीर मैडम व श्रीमती गायकवाड मॅडम ,श्रीमती साखरवाडे मॅडम, स्टेज व डेकोरेशन श्री. श्रावणकर सर व श्री कमाने सर,कार्यालयीन व्यवस्था श्री.कृष्णाजी मानकर , क्रिडा प्रमुख श्री शेख सर श्री मोहनकर सर, श्रीमती वाघमारे मॅडम व श्री. शहारे सर , तसेच देखरेख व शिस्त इतर कर्मचारी वर्ग आशा ताई,सुधीर बडवाईक भाऊ ,निशा गोडबोले ताई,लक्ष्मी लोणारे ताई ,आणि मुख्य म्हणजे आम्हा सर्व शिक्षकांना आणी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आमचे आदरणीय मुख्याध्यापक / प्राचार्य नगर परीषद कस्तुरबा विद्यालय तुमसर सर्वानी मिळून नववर्षाचे स्वागत करत आप- आपल्या जबाबदाच्या अतीशय उत्कृष्ठ पणे पार पाडुन कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img