तुमसर :- भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषि उत्पन्न बाजार समिती म्हणुन तुमसर कृषि उत्पन्न बाजार समिती ओळखली आहे. पण येथिल काम करणाऱ्या हमालांना प्रती पोत्या मागे दर कमी मिळतं असल्याने आज हमालांनी बंद पुकारले आहे.भंडारा जिल्ह्यात धान खरेदी करीता प्रसिद्ध म्हणुन तुमसर कृषि उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. गेल्या अनेक दशकापासून बाजार समिति कार्यरत आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यातील तसेच मध्यप्रदेश येथिल धान, गूळ विक्री साठी येथे आणल्या जातो. दिवसेंदिवस महागाई वाढत असून धानाचे दरही वाढले पण बाजार समितीच्या हमालांचे दर वाढले नाही. तीन वर्षापासून प्रती पोता साडे तीन रुपयेच मिळतं आहे. या कामात मेहनत जास्त असल्याने बरेच हमाल काहीं दिवस काम करून निघून जातात. आता जे अनेक दशकापासून कार्यरत आहेत. त्या मजुरांना प्रती पोता 10 रूपये हमाली द्यावी या मागणीला घेउन आज बाजार समितीच्या हमालानी बंद फुकाराला आहे. जो पर्यंत मागणी मान्य होणार नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहील अशा पवित्रा हमालानी घेतला आहे. या बंद मुळे शेतकर्यांनी आणुन ठेवलेला धान जसेच्या तसेच पडुन आहे. जर पाऊस आला तर मोठ्या प्रमाणत शेतकऱ्यांचा नुकसान होण्याची शक्यता आहे.