भंडारा :- विग्नेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी देशाचे नाव कुस्तीपटू म्हणून उंचावले ज्या देशात महिला कुस्ती स्पर्धेत तयार होत नव्हत्या अशा स्पर्धेत महिला खेळायला उतरल्या व देशाचे नाव उंचावले अशा स्त्रियांवर होणारा अत्याचार व लैंगिक शोषण करणाऱ्या सांसद असणारे ब्रिजभूषण सिंग व स्वतःला कुस्ती संघाचे अध्यक्ष समजनारे महारथी अशा अश्लिल कार्य करतात व ज्या देशाचे नाव अजरामर करीत आहे त्या कुणाच्या आई बहिणी आहेत यांच्या सारख्या महिलांना जर या देशात न्याय मिळत नाही. त्यांची बाजू हे भाजप सरकार समजून घेत नाही उलट त्यांच्या व त्यांच्या कुटूंबीयावर दबाव आणून त्यांना केस मागे घेण्यास सांगत आहे. तर अशा सर्वसाधारण महिलेचे काय ? त्यातर रोज जाळल्या जात आहे. त्यांचा मर्डर होत आहे त्यांचे तुकडे, तुकडे करून कुकरमध्ये उकडले जात आहे. फिजमध्ये ठेवून खाल्ल्या जात आहे. या आई बहिणीचे कोण वाली आहेत? त्यांना कशी सुरक्षा मिळणार ही हुकुमशाही व अराजकतेचे काय होणार भाजप सरकारची व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या गुन्हयावर पांघरून टाकल्या जात आहे. कहा गया भारत का कानुन विरोधी पक्षनेत्यांवर बिना आरोपाने कुठलेही पुरावे नसतांना चौकशी लावल्या जाते. ईडी बसवल्या जाते व सत्तेत असणाऱ्या गद्दारांवर काय ? स्वतःला मोठया नेत्या समजणाऱ्या वरिष्ठ नेत्या महिला आघाडीच्या स्मृती ईरानी या आज कुठे आहे संपुर्ण देशातील विविध संगठनेचा पाठींबा असून त्या उघडया डोळयाने बघत आहे. त्या महिला नव्हेत काय? त्या आज देशात नाहीत काय? अशा सरकारचा आम्ही भंडारा जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जाहीर निषेध करतो व ब्रिजभूषण शरण सिंह यांना कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाच्या तसेच खासदार पदाचा राजीनामा घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्हाध्यक्ष सरिता मदनकर करते.