ताजा-खबरसंपादकीय

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन डंपरावर कारवाई !!

साकोली शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री शासनाचा महसूल बुडवून विनारॉयल्टीने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन डंपरावर येथील उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले व पथकाने ही कारवाई करीत दोन्ही डंपर जवळील साकोली बसस्थानक आगारात जमा केले. ही बेधडक कारवाई बुधवार ११ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री २:३० वाजता केली असून यात वाहतूक पोलीस पेट्रोलींग पथकाचेही सहकार्य विशेष राहिले. टाटा हाईवा क्र. MH ३१ FC ५३८१ यात विनारॉयल्टीने तालुक्यातील नदीघाटाहून वाळूची चोरी करतांना पथकाला माहिती मिळाली. माहितीच्या आधारे मध्यरात्रीच उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले हे महसूल विभागीय चमुंसह राष्ट्रीय महामार्गावर वाळूची चोरटी वाहतूक करतांना दोन डंपर पकडले. या कारवाईत महामार्ग पोलीस विभाग गडेगाव शाखेची पेट्रोलींग चमु महामार्गावर करडी नजर ठेवून या धडक कारवाईत महसूल प्रशासनाला सहकार्य केले. यात अजून अशोक लेलॅंड डंपर क्र. MH ४० CD १५८१ ने नुकतेच मुरूम चोरून नेतांनी याच महसूल पथकाने कारवाई करून डंपर आणि एक विना क्रमांकाचा ट्रैक्ट्ररही वाळूची चोरटी वाहतूक करताना पकडले व सकोली बसस्थानक आगारात जमा केला आहे. यात पहिला वाळू डंपर मालक पिंडकेपार येथील राजकीय क्षेत्रातील पंकज कापगते असून दूस-या डंपरमालकाचे व ट्रैक्ट्ररमालकाचे नाव कळू शकले नाही. सदर धडक कारवाई झाल्यानंतर साकोली शहरात काही डंपरमालकात यात “सेटींग” होत असल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button