भंडारा :- जिल्हाधिकारी व दंडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस भरती करिता आलेल्या उमेदवारांचे आधार कार्ड साॅफ्टवेअर व्दारे पडताळणी शिबीर पोलीस मुख्यालय कार्यालय भंडारा येथे नुकतेच घेण्यात आले.
पोलीस भरती-२०२३ करिता आलेल्या उमेदवारांचे आधार कार्ड साॅफ्टवेअर व्दारे पडताळणी शिबीर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक फारूख शेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
त्याप्रसंगी व्हीएलईचे संचालक समीर नवाज, जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार हेल्पलाईन विभागाचे नेटवर्क अभियंता अमित नंदनवार, अतिरिक्त जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक योगेश बांगडकर, पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस निरीक्षक तायडे इत्यादी उपस्थित होते.

त्यावेळी ऑपरेटर अनिकेत शेंडे, रोशन वंजारी, पिंटू रोडगे, निखिल वंजारी, राकेश क्षिरसागर, राजकुमार गिऱ्हेपुंजे, हितेश खोब्रागडे, राहुल चव्हाण, दुर्गेश बोंदणकर, भास्कर मारबते, प्रशांत नागदेवे, श्रृती देशकर यांनी रविवार दिनांक २६ मार्च २०२३ ला सकाळी ५.३० वाजता पासून पोलीस भरती करिता आलेल्या उमेदवारांचे आधार कार्ड साॅफ्टवेअर व्दारे पडताळणी केली आहे.
या शिबीरात उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील १२ आधार सेवा केंद्राचे व्हीएलई व ऑपरेटर यांनी उपस्थित पोलीस उमेदवारांची आधार कार्ड साॅफ्टवेअर व्दारे पडताळणी केली आहे.
आधार पडताळणी शिबिराची संपूर्ण जबबदारी व्हीएलईचे संचालक समीर नवाज यांनी पार पाडली आहे.