Homeताजा-खबरआ. भोंडेकर यांचा खेळाडूला मदतीचा हात

आ. भोंडेकर यांचा खेळाडूला मदतीचा हात

भंडारा :- घरची आर्थिक परीस्थित खालावलेली असली तरीही खेळायची जिद्द सोडली नाही. अश्यातच पटना येथे होणाऱ्या भाला फेक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. परंतु आर्थिक अडचण तोंडावर उभी. याची माहिती आ. नरेंद्र भोंडेकर यांना मिळताच खेळाडूला सहकार्य म्हणून १० हजार रुपायची रोख मदत पाठवली. आणि फोन वर चर्चा करून भविष्य करिता शुभेच्छा देत त्याचे धाडस बांधले.
भंडारा तालुक्यातील दवडीपार बाजार येथील निवासी लिखित शंकरराव देलनकर वय वर्ष 13 हा सातव्या वर्गातील विद्यार्थी असून वडील शेती करून घर चालवितात. लिखित ला शिक्षणा सोबतच खेळाची आवड असल्याने त्याने भाला फेक या खेळत नाव कमवीत त्याने आपल्या देशाच्या नावाने एका वर्षात चार मेडल पटकावले. नेपाळ पोखरा येथे नॅशनल ॲथलेटिक्स गेम प्रथम पुरस्कार गोल्ड मेडल, दिल्ली चॅम्पियनशिप गोल्ड मेडल, उत्तर प्रदेश सिल्वर मेडल, नॅशनल ॲथलेटिक्स गेम्स गोवा गोल्ड मेडल असे चार मेडल त्याने आपल्या नावावर पटकावले. एवढी जिद्द चिकाटीच्या खेळाडूंना पटना येथे नॅशनल स्पर्धे करिता अवसर मिळाले. अश्यात त्याला आर्थिक अडचण आल्याचे आ. नरेंद्र भांडेकर यांना कळाले. आ. भोंडेकर यांनी त्याच्याशी फोन वर संपर्क साधून चर्चा केली आणि अडचण जाणून घेत त्याला भविष्या करिता शुभेच्छा दिल्या. सोबतच खेळायला जाण्यास अडचण येवू नये म्हणून आ. भोंडेकर यांनी आर्थिक मदत म्हणून १० हजार रोख पाठविले. आर्थिक मदत केले त्या अनुषंगाने स्वीय सहाय्यक मंगेश वंजारी याच्या हस्ते हि रक्कम प्रदान करण्यात आली. या वेळी बाळासाहेबांची शिवसेना पहेला चे गट नेता राजू थोटे व बाळासाहेबांची शिवसेना दवडीपार बाजार येथील कार्यकर्ते भागवतजी हजारे व खेळाडूचे आई-वडील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img