ताजा-खबर

लांडग्यांच्या हल्ल्यात 5 शेळ्या ठार

लाखांदूर :- घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर लांडग्यांनी हल्ला चढवीत गोठ्यात बांधलेल्या 5 शेळ्या ठार करीत एक गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यात घडली. सदर घटना दि.26 मार्च रोजी रात्री 1.30 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील ईटान येथे उघडकीस आली. धीरज बाळकृष्ण घरडे रा. ईटान असे त्या नुकसानग्रस्त पशुपालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धीरज घरडे यांच्या घराशेजारील गोठ्यात नेहमीप्रमाणे त्यांची जनावरे बांधली असायची. घटनेच्या दिवशी मध्यरात्री 1 ते 2 वाजे च्या दरम्यान सर्व गाढ झोपेत असताना अचानक धीरज घरडे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या शेळ्यावर लांडग्यांच्या समूहाने हल्ला चढवित 5 शेळ्यांचा फडशा फाडला तर, एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.
दरम्यान, गोठ्यात बांधलेल्या गाईचा मोठ्याने आवाज ऐकून धीरज घरडे यांना जाग आली. त्यांनी उठून बघितले असता गोठ्यात बांधलेल्या शेळ्या गोठ्यात नव्हत्या. त्यांनी आजूबाजूला बघितले असता एक प्राणी त्यांना शेताकडे दूर जाताना दिसला. दरम्यान, त्यांनी टॉर्च च्या प्रकाशात आजूबाजूला शोधाशोध केला असता त्यांना काही शेळ्या व त्यांचे अवशेष इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत दिसले. सकाळच्या सुमारास सदर घटनेची माहिती लाखांदूर वण विभागाला देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार लाखांदूरचे वणपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात लाखांदूर वण विभागाचे वणरक्षक जी.डी. हत्ते यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.
या घटनेतील नुकसानग्रस्त धीरज घरडे यांच्या 5 शेळ्यांपैक 2 शेळ्या गाभण असल्याची माहिती पशुपालकाने दिली आहे. या घटनेमध्ये सदर पशुपालकाचे एकूण 60 हजाराचे नुकसान झाले असून पशुपालकासह गावकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button