Breaking Newsसंपादकिय

BREAKING NEWS : पुयार येथील जिल्हा परिषद शाळेत घडली दुर्दैवी घटना……

नवीन शैक्षणिक सत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतच विद्युत करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली आहे.यशस्वी सोपान राऊत वय ६ वर्ष रा. पुयार असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.आज सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली.यावेळी ती लघुसंकेला गेली असता जवळच लावन्यात आसलेल्या RO च्या जिवंत विद्युत तारचा करंट लागला व ती लघवी गृहातच बेशुद्ध पडली.यशस्वीला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता येथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.दरम्यान लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

यह भी देखे : जिल्हा परिषद शाळेत विद्युत करंट लागून पहिल्या वर्गातील विद्यार्थिनीचा मृत्यू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button